राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-१)
१. मूल्येन्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांवर कोणतीही मानवी व्यवस्था आधारलेली असावी. त्यामधील न्याय हे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फक्त न्याय हे एकच तत्त्व घेतल्यास त्यातून स्वातंत्र्य व समता या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात आपोआप विकसित होतात. न्याय म्हणजे फक्त कायद्याचे बंधन व पालन या अर्थाने नाही, तर मूलभूत अर्थाने न्याय हे तत्त्व …